गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. १३ एप्रिल (रविवार) रोजी विशेष ‘सामान्य ज्ञान परीक्षा’ आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी ३ केंद्रे निश्चित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना फक्त ₹२० फी भरून सहभाग घेता येईल.
नोंदणी प्रक्रिया सोपी असून बारकोड स्कॅन करून Google फॉर्म भरावा लागेल. तसेच दुसऱ्या बारकोडद्वारे ऑनलाईन पेमेंट करता येईल. ऑनलाईन पेमेंट जमत नसल्यास, आयोजकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून ऑफलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतः तसेच त्यांच्या मित्रपरिवारातील, शाळा-कॉलेजातील, आजी-माजी विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे!
