कोहमारा येथे बिरसा मुंडा व राणी दुर्गावती स्मारक समिती यांच्यातर्फे “गोंड राजाल-गोंड रानी फॅशन शो २०२५” या राज्यस्तरीय कला आणि वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या भव्य स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या आदिवासी युवक-युवतींनी आपल्या पारंपरिक तसेच आधुनिक वेशभूषेचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार बडोले, माजी मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आमदार अर्जुनी मोर. विधानसभा यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना सांगितले की, “अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे आदिवासी युवक-युवतींना आत्मविश्वास मिळतो आणि त्यांची कला जगासमोर येते. यामुळे आदिवासी समाज २१ व्या शतकात मागासलेला नसल्याचे सिद्ध होत आहे.”
कार्यक्रमादरम्यान स्पर्धकांनी आपल्या पारंपरिक पोशाखांमधून गोंड, कोलाम, पारधी, माडिया, आणि इतर आदिवासी संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगांचे दर्शन घडवले. आधुनिक फॅशनसोबत आदिवासी परंपरांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले.
शेवटी, राजकुमार बडोले यांनी भविष्यातही अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
