अर्जुनी मोर (प्रतिनिधी) : पारसोडी/रैय्यत, ता. अर्जुनी मोर येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेमुळे गावातील नागरिकांना शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष श्री लायकरामजी भेंडारकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री यशवंतजी गणवीर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री किशोरजी तरोणे, सरपंच श्री दयारामजी लंजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार बडोले यांनी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याच्या उद्दिष्टावर भर दिला असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
