ग्राम सौंदड येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 104 व्या जयंती निमित्त परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीने ‘मानव धर्म चर्चा भवन’ चे भव्य लोकार्पण संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. शालिंदरजी कापगते (माजी उपसभापती, पंचायत समिती सडक अर्जुनी), सौ. वर्षाताई शहारे (पंचायत समिती सदस्य, सडक अर्जुनी), श्री. हर्षजी मोदी (सरपंच, ग्रामपंचायत सौंदड), श्री. सदाशिवजी विठ्ठले (माळी समाज अध्यक्ष, सौंदड), सौ. समिताताई इरले, श्री. संदीपजी मोदी, श्री. पुरुषोत्तमजी निंबेकर, श्री. सावळरामजी इरले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आमदार राजकुमार बडोले यांनी बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्म विचारधारेचे स्मरण करत त्यांच्या शिकवणींच्या व्यापक प्रचाराची गरज अधोरेखित केली. उपस्थित सेवक-सेविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला.
