गणेशपूर | स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर (भंडारा) येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे दि. 8 मार्च 2025 रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रेल्वे मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
स्पर्धांमध्ये 100 मीटर, 200 मीटर व 400 मीटर धावणे तसेच गोळा फेक, थाळी फेक आणि भाला फेक या स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा समन्वयक डॉ. रक्षित बागडे यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत महाविद्यालयातील मुली आणि मुलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना दि. 11 मार्च रोजी आयोजित बक्षीस वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डोंगरवार, प्रा. प्रशांत कठाने, प्रा. वंदना जीवने, कु. अनिता बनसोड, श्री. महेश कुथे, श्री. हेमराज तुपटे, श्री. बोंद्रे आणि श्री. पासंग कहालकर यांनी विशेष मेहनत घेतली.