अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत घरकुल मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण सोहळा पंचायत समिती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होत आहे.
कार्यक्रमात आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता प्रदान करण्यात आला. या वेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. आम्रपालीताई डोंगरवार, उपसभापती श्री. संदीपजी कापगते, पंचायत समिती सदस्या सौ. पुष्पलताताई दृगकर, गटविकास अधिकारी पल्लवीताई वाडेकर, स्थापत्य अभियंत्रिक सहाय्यक श्री. बी.ए. पवार, विस्तार अधिकारी श्री. एन.एस. लंजे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार राजकुमार बडोले यांनी या वेळी लाभार्थ्यांशी संवाद साधत प्रधानमंत्री आवास योजनेचे महत्त्व स्पष्ट केले आणि योजनेचा लाभ घेऊन आपले हक्काचे घर बांधण्याचे आवाहन केले. शासनाच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळत असून, ही योजना गरजू कुटुंबांसाठी वरदान ठरत आहे.
