पुणे – नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी SKF इंडिया लिमिटेडने बेअरिंग उद्योगातील प्रशिक्षणार्थी पदांसाठी थेट मुलाखतींचे आयोजन केले आहे. यामध्ये डिप्लोमा (मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाइल) उत्तीर्ण उमेदवारांना आकर्षक वेतनासह भविष्य घडविण्याची संधी मिळणार आहे.
भरतीसाठी आवश्यक पात्रता:
✅ शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा (मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाइल)
✅ शैक्षणिक वर्ष: २०२१, २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये उत्तीर्ण झालेले
✅ वयोमर्यादा: २५ वर्षांपर्यंतचे पुरुष आणि महिला उमेदवार
वेतन आणि सुविधा:
▶ मासिक पगार – ₹१६,१८०/-
▶ मोफत बस आणि कॅन्टीन सुविधा
▶ ₹२ लाखांपर्यंत मेडिकल आणि अपघात विमा संरक्षण
▶ भविष्यात कायम होण्याची सुवर्णसंधी
मुलाखतीचे वेळापत्रक आणि स्थळ:
📅 ८ एप्रिल २०२५ ते १५ एप्रिल २०२५ (रविवार वगळता)
📍 SKF इंडिया लिमिटेड, चापेकर चौक, चिंचवड, पुणे – ४११०३३
🕙 सकाळी १०:०० ते दुपारी १:३० पर्यंत
काय आणावे?
➡ पूर्ण माहितीसह अर्ज
➡ शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9561669944
