अर्जुनी मोरगाव (ता. १४ एप्रिल):
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अर्जुनी मोरगावच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. संघटनेच्या सदस्यांनी ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी मोरगाव येथे दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करत या थोर महामानवांना सामाजिक कार्याच्या माध्यमातून अभिवादन केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ही परंपरा कायम राखत शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी मिळून हा सामाजिक उपक्रम पार पाडला. या फळवाटपाच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी समाजातील उपेक्षित, गरजू रुग्णांसाठी या महामानवांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. रुग्णालय प्रशासनानेही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले व संघटनेचे आभार मानले.
या कार्यक्रमात अरविंद नाकाडे, गजानन रामटेके, भूवन औरासे, राजेश साखरे, कैलास हांडगे, कीर्तीवर्धन मेश्राम, किशोर लंजे, प्रल्हाद कापगते, सुरेश रामटेके, युवराज खोब्रागडे, अरुण फाये, उमाकांत मेश्राम, अनिल सूर्यवंशी, धनंजय मडावी, अमोल चौरे, गोविंद बगडे, चिंतामण कांबळे, प्रकाश सांगोडे, अजय घरामी, प्रमोद चाचरे, नितीन तिडके यांसह अनेक शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष कैलास हांडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरचिटणीस किशोर लंजे यांनी मानले.
