घुसोबाटोला येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत विविध मान्यवरांनी उपस्थित मातृशक्तीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीपजी कापगते (उपसभापती, पं. स. अर्जुनी मोर.), लताताई भेंडारकर (सरपंच, सिलेझरी), सुखदेवजी मेंढे (उपसरपंच, सिलेझरी), शालुबाई मेंढे (पोलीस पाटील, घुसोबाटोला), दिनेशजी उके (पोलीस पाटील, सिलेझरी), खंडाईतजी (पोलीस पाटील, डोंगरगाव), सुभाषजी ब्राह्मणकर (अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था), प्रकाशजी टेंभूर्णे, पुरुषोत्तमजी डोये, यशवंतजी भेंडारकर, संजयजी भेंडारकर, जयरामजी हातझाडे, गुड्डूजी डोंगरवार व ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या संघर्षशील प्रवासाला उजाळा देत, त्यांच्या कार्यशक्तीचा गौरव केला. महिलांच्या सहभागाशिवाय कोणतेही समाजबांधणीचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. समाजातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू राहतील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
“हे नारी, तुझ्या जिद्दीला सलाम!” या उद्घोषणेतून उपस्थित महिलांचे सन्मान करण्यात आले.
