गोंदिया जिल्ह्यातील खजरी व डव्वा गावाजवळ दुपारी साडेबारा वाजता शिवशाही बसला अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये एक महिला पोलिस कर्मचारी देखील आहे. ३ लोक गंभीर जखमी असून २६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
घटना घडली त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने आवश्यक मदत पोहोचवली असून जखमींना तातडीने उपचार देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली असून जखमींनी लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.
घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांची नावे पुढीलप्रमाणे:
1.स्मिता सूर्यवंशी (३२) – पोलिस कर्मचारी, मोरगाव अर्जुनी
2.मंगला राजेश लांजेवार (६०) – पिपरी, भंडारा
3.राजेश देवराम लांजेवार (६०) – पिपरी, भंडारा
4.कल्पना रविशंकर वाणखेडे (६५) – वरोरा, चंद्रपूर
5.रामचंद्र कनोजे (६५) – चांदोरी, साकोली, भंडारा
6.आन्जिरा रामचंद्र कनोजे (६०) – चांदोरी, साकोली, भंडारा
7.आरीफ अझहर सैयद (४२) – घोटी, गोरेगाव, गोंदिया
8.अझहर अली सैयद (५५) – घोटी, गोरेगाव, गोंदिया
9.नयना विशाल मिटकरी (३५) – बेसा, नागपूर
10.अनोळखी पुरुष (ओळख पटलेली नाही)
11.अनोळखी पुरुष (ओळख पटलेली नाही)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी १० लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश दिला आहे. तसेच, गोंदिया जिल्ह्यातील प्रशासनाला मदतीचे निर्देश देण्यात आले आहेत.
या अपघाताच्या बातम्या देशभरातून पसरल्या असून सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.