मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर मतदानाला एक महिना उरले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मतदारसंघात दहा हजार मतांची फेरफार सुरू आहे आणि मतदार यादीत गोंधळ निर्माण करण्याचा षडयंत्र उघड झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू केले आहे, आणि या प्रक्रियेस चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचा आरोप संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपांनी राज्यात खळबळ उडाली आहे.
राऊत यांनी सांगितले की, त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि निवडणूक पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी केली. नाना पटोले यांच्यानुसार, राज्यातील निवडणूक पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप केला गेला आहे.
महाविकास आघाडीने शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव या मतदारसंघांमध्ये मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप केला आहे.
राऊत म्हणाले, “महायुतीला पराभवाची भीती वाटत असल्याने ते लोकशाहीविरोधात कटकारस्थान करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला या संदर्भात माहिती दिली आहे.”
पटोले यांच्यानुसार, महायुतीला हरण्याच्या भीतीमुळे मूळ मतदारांचं नाव कमी करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी आरोप केला की, बाहेरच्या राज्यांतील मतदारांचे आधारकार्ड जोडून 10,000 लोकांची नावे नोंदवली जात आहेत, ज्यामुळे ओरिजनल मतदारांचे नाव हटवले जात आहे.
ज्यांनी आपल्याला संपवलं त्यांना संपविण्यातही आपला विजय, जरांगे पाटलांचा मराठा समाजाला ‘मेसेज’