विधानभवन, मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ | दिवस ४
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील अपूर्ण पुलं आणि अरुंद रस्त्यांचे प्रश्न आमदार राजकुमार बडोले यांनी जोरदारपणे मांडले. मागील १५ वर्षांपासून रखडलेले डोंगरगाव – रेंगेपार पुलाचे काम आणि मझगाव पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
त्याचबरोबर धाबेटेकडी – अर्जुनी मोरगाव – सुकडी – गोठणगाव – नवेगाव या २२ किमी लांबीच्या रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी करण्यात आली. सद्यस्थितीत हा रस्ता केवळ ३.७५ मीटर रुंद ठेवण्यात आला आहे, जो पुढील १० वर्षांसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या देखरेखीखाली राहणार आहे. जंगलातून जाणाऱ्या १२ किमी रस्त्याची रुंदी किमान ५.५ मीटर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, मोरगाव – सिरोली – महागाव रस्त्याचे प्र. जि. मा. मध्ये रूपांतर करून त्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने हाती घ्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
🔗 संपर्क साधा: राजकुमार बडोले यांचा अधिकृत X अकाउंट