पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू हा केवळ नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दमानिया यांनी या प्रकरणात अधिक सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. या मृत्यूमागे गंभीर सत्य दडले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, त्यांनी याआधीही मुंडेंविरोधात गंभीर आरोप करत न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती.
या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अथवा पोलीस तपास अहवाल समोर आलेला नसला, तरी अंजली दमानियांच्या ट्वीटमुळे या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
