शिवराज्य सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अर्जुनी मोरगाव तालुका वतीने दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी किल्ला प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वच्छता अभियान आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या विशेष उपक्रमात तालुकाध्यक्ष लोकपालजी गहाणे, माजी उपाध्यक्ष इंजि. यशवंतजी गणवीर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किशोरजी तरोणे, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान स्वच्छता मोहिमेअंतर्गत किल्ल्यावरील प्लास्टिक आणि कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आले. गड-किल्ले स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी इतिहास जतन व मातृभूमीचा अभिमान जपण्याचे आवाहन केले.
या अभियानात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभाग घेतला आणि स्वच्छतेचा महत्त्वाचा संदेश दिला. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील,” असे प्रतिपादन आमदार राजकुमार बडोले यांनी केले.
