प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवराज्य सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अर्जुनी मोरगाव येथे लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्या शारदाताई बडोले यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला.
गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील देवुटोला शेतशिवारात १७ वर्षीय कु. पूर्णिमा नागवंशी हिची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळण्यात आले. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी गोरेगावात सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्राम शाखा खोबा/हलबी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.
अर्जुनी/मोरगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पंचायत समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
कोहमारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुरुस्तीबाबत विशेष बैठक पार पडली. वनविभागाच्या अडचणी दूर करून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला असून भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने बायपास रस्ता तयार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
गोंदियात तिबेटी समुदायाच्या शिबिरात आयोजित बौद्ध धर्मीय कार्यक्रमात गेशे ल्हारामपा रिनपोचे यांनी उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि आशीर्वादाने भाविकांना शांतीचा अनुभव मिळाला.
On 20th February 2025, a crucial meeting of Maharashtra State Electricity Distribution Company officials was held under the chairmanship of MLA Rajkumar Badole. The meeting addressed issues in power distribution, discussed improvements, and planned future strategies to ensure efficient electricity supply across the state.