अर्जुनी मोरगाव: लोकमत सखी मंच व अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या स्पर्धेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी उत्साहात आणि आत्मविश्वासाने रॅम्पवॉक करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये शारदाताई बडोले यांच्या प्रेरनेने आयोजित करण्यात आला होता. लोकमत सखी मंचच्या संयोजिका सौ. प्रितीताई खोब्रागडे यांचे विशेष योगदान राहिले.
मान्यवरांचा उपस्थितीत कार्यक्रमाची शोभा वाढली
या सोहळ्याला नगरसेविका सौ. ममताताई भैय्या, तसेच सौ. मंजुषाताई तरोने, सौ. पूनमताई मंत्री, सौ. प्रतिभाताई फुंडे, सौ. नंदिनीताई धकाते, सौ. कल्पनाताई काकडे, सौ. रोहिणीताई कुंभारे, सौ. नीताताई लांजेवार, सौ. रेणुकाताई जायस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शारदाताई बडोले उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात महिला सशक्तीकरणाच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भरतेला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनी आत्मविश्वासाने स्वतःला सादर करण्याची संधी मिळाली, तसेच समाजात स्त्रीशक्तीचा सन्मान आणि गौरव वाढवण्याचा संदेश देण्यात आला.
