"चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने दुबई इंटरनेशनल स्टेडियमवर सर्व सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनल देखील दुबईतच होणार असल्याने इतर संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताने ग्रुप स्टेजपासून सेमीफायनलपर्यंत बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. मात्र, सर्व सामने एकाच मैदानावर खेळण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे."