Monday, February 24, 2025

कोण कोण होणार मंत्री? वाचा संभ्याव्य ४३ मंत्र्यांची संपूर्ण यादी

५ डिसेंबर २०२४ | महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला असून, महत्त्वाच्या राजकीय घडामोडीनंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

महायुती सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार असून, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना महत्त्वाची भूमिका दिली गेली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर आता महायुतीतील नेत्यांमध्ये मंत्रिमंडळातील स्थानांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

११ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार

शपथविधीनंतर येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश होईल. मंत्रिपदासाठी ४३ नेत्यांची संभाव्य यादी समोर आली असून, कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या नेत्यांचे संभाव्य मंत्रीपद

राज्य मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्र्यांची क्षमता आहे. त्यामध्ये भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

भाजपचे संभाव्य मंत्री:

1. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

2. राधाकृष्ण विखे पाटील

3. सुधीर मुनगंटीवार

4. चंद्रकांत पाटील

5. गिरीश महाजन

6. सुरेश खाडे

7. रवींद्र चव्हाण

8. अतुल सावे

9. मंगल प्रभात लोढा

10. राहुल नार्वेकर

11. जयकुमार रावल

12. चंद्रशेखर बावनकुळे

13. बबनराव लोणीकर

14. पंकजा मुंडे

15. देवयानी फरांदे

16. किसन कथोरे

17. नितेश राणे

18. आशिष शेलार

19. संभाजी निलंगेकर

20. राहुल कुल

शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य मंत्री:

1. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)

2. गुलाबराव पाटील

3. दादा भुसे

4. संजय राठोड

5. उदय सामंत

6. तानाजी सामंत

7. अब्दुल सत्तार

8. दीपक केसरकर

9. शंभुराज देसाई

10. भरत गोगावले

11. अर्जुन खोतकर

12. संजय शिरसाट

13. योगेश कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री:

1. अजित पवार (उपमुख्यमंत्री)

2. धनंजय मुंडे

3. दिलीप वळसे पाटील

4. छगन भुजबळ

5. हसन मुश्रीफ

6. धर्मराव आत्राम

7. आदिती तटकरे

8. अनिल पाटील

9. राजकुमार बडोले

10. माणिकराव कोकाटे

शपथविधीनंतर महायुतीचा आत्मविश्वास

शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीतील नेत्यांनी सरकार स्थिर आणि टिकाऊ होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

आता येत्या ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवराज्य सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान; अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान होणार असून, १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्चला कामकाज सुरू ठेवण्याचा व १३ मार्चला होळी निमित्ताने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्जुनी मोरगाव येथे लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्या शारदाताई बडोले यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला.

सडक अर्जुनीत स्वच्छता अभियानाने दिला स्वच्छतेचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सडक अर्जुनी शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

निर्दय हत्या प्रकरणी गोरेगावात धडक निषेध मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील देवुटोला शेतशिवारात १७ वर्षीय कु. पूर्णिमा नागवंशी हिची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळण्यात आले. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी गोरेगावात सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळा संपन्न

ग्राम शाखा खोबा/हलबी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत अर्जुनी/मोरगाव येथे घरकुल मंजुरी व हप्ता वितरण

अर्जुनी/मोरगाव येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पंचायत समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

वनविभाग अडचणी दूर करण्याचा प्रस्ताव, बायपास निर्माणाचा विचार

कोहमारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुरुस्तीबाबत विशेष बैठक पार पडली. वनविभागाच्या अडचणी दूर करून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला असून भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने बायपास रस्ता तयार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Related Articles